काल राज्यात ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आतापर्यंत ४८,७४,५८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत .यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९०.१९% एवढा झाला आहे. काल दिवसभर राज्यात २६,६१६ नवीन रुग्णाची भर पडली. राज्यात काल दिवसभरात ५१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती या गृहविलगीकरणात तर २८,१०२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत तर सध्या राज्यात ४,४५,४९५ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.