माध्यमांनी कोरोनाविषयी जनजागृती करावी आणि लोकांमधील भिती दूर करावी- पंतप्रधान मोदी

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट खूप मोठी आहे.परंतु आरोग्य यंत्रणा ,योग्य योजना, पुरेसा औषधपुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करुया.लोकांचे साहस शिस्त आणि त्यांचे प्रयत्न याद्वारे आपण कोरोनाविरोधात लढूया.देशात ऑक्सीजन उत्पादन आणि सर्वांना पुरवठा यासाठी सर्वतोपरी आपण सर्व प्रकारे प्रयत्न करु असे पंतप्रधान मोदी म्हणाले मंगळवारी रात्री त्यांनी जनतेशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले की फार्मा कंपन्यांनी औषधांचे उत्पादन वाढवले आहे.सर्व कंपन्यांची सरकार मदत घेत आहे.आपण रुग्णालयात बेडसची संख्या वाढवत आहोत,मोठी कोविड केंद्रे उभारत आहोत.या संकटकाळात लोकांच्या सेवेसाठी मेहनत करणाऱ्या आरोग्य सेवकांना धन्यवाद देतो तसेच कोरोना संसर्गाचे मायक्रो कंटेन्मेंट झोन्स तयार करुन कोरोनाशी लढूया असे सांगत असताना राज्यांनी लाॅकडाऊन टाळावेत, तो शेवटचा पर्याय असायला हवा असे आवाहन केले.माध्यमांनी कोरोनाविषयी जनजागृती करावी आणि लोकांमधील भिती दूर करावी.

मजुरांचे काम बंद होऊ नये आणि त्यांना लस मिळावी, अशी योजना आहे त्यामुळे मजुरांनी गावी जाऊ नये, सरकारी रुग्णालयांत मोफत लस यापुढेही दिली जाईल.सर्वाचे जीवन सुरक्षित राहावे आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारे प्रयत्न करीत आहेत. रामनवमीच्या पूर्वसंध्येला आवाहन आहे की ,मर्यादांचे पालन करा कोरोनापासून वाचण्याच्या सर्व उपायांचे १००% पालन करा. रमजान धैर्य ,आत्मसंयम व अनुशासनाचे धडे देतो,लोकांनी त्याचे काटेकोर पालन करावे. असेही आवाहन त्यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*