शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर ६ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलीय. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी माहिती थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*