रत्नागिरी येथील अँपेक्स कोव्हिड रुग्णालयाबाबत लोकांच्या वाढत्या तक्रारी आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये रूग्णांवर उपचार करताना शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन उपचार केले जात आहेत ज्या रुग्णांना ऑक्सिजन अथवा रेमेिडिसिविर इंजेक्शनची आवश्यकता नाही तेथे वापर करून रुग्णांचे बिल वाढवले जात आहेत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच शासनाने केलेल्या प्रोटोकॉल पेक्षा वेगळी ट्रीटमेंट दिली जात असल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने येथील आयसीयू युनिट बंद केले असून हे काेविड हॉस्पिटल प्रशासन ताब्यात घेण्याच्या विचारात आहे काेविड रुग्णांसाठी प्रशासनाच्या देखरेखीखाली तेथील आहेत त्या डॉक्टर क्टरांकडून हे हॉस्पिटल चालविले जाणार असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन गंभीर विचार करीत असल्याची माहिती सामंत यांनी दिले याबाबत प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे.