मुंबई – राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला असून हा बळी रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, हा बळी संगमेश्वर तालुक्यातील एका महिलेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. डेल्टा प्लस या नव्या विषाणूने राज्यात पहिला बळी गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केली. मृत व्यक्ती 80 वर्षाची महिला असून ती संगमेश्वर तालुक्यातील रहिवासी होती असे समजते. राज्यात सध्या डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आहेत.