जिल्ह्यात सरासरी 54.44 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 54.44 मिमी तर एकूण 490 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 45.30 मिमी, दापोली 16.40 मिमी, खेड 59.40, गुहागर 52.30 मिमी, चिपळूण 32.30 मिमी, संगमेश्वर 57.10 मिमी, , रत्नागिरी 104.60 मिमी, राजापूर 61.00 मिमी,लांजा 61.60 मिमी. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 13 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड तालुक्यात मौजे दोणारी-वडवली रस्त्यावर दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद होता. सदर ठिकाणी सा.बां. विभागाने दरड हटवून रस्ता सुरळीत केला. दापोली तालुक्यात मौजे दापोली येथे मिलींद तुकाराम खोपटकर यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे घराचेअंशत: 5395 रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे दाभोळ येथे विजय बोरघरे यांच्या घराचा बांध ढासळल्याने शेजारील रामचंद्र बोरघरे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. चिपळूण तालुक्यात मौजे माउकी येथे संतोष घाणेकर यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे नांदिवसे-राधागनर येथे विनायक शिंदे यांच्या गोटयाला अचानक आग लागून खाक झाला. कोणतीही जिवीत हानी नाही. राजापूर तालुक्यात मौजे दोनिवडे येथे बाळू भागाजी पवार यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान रु. 1 लाख 15 हजार रुपयांचे . कोणतीही जिवीत हानी नाही.मौजे चुनाकोळवण येथे लक्ष्मण तानाजी मटकर यांच्या पडवीचे पाऊसामुळे अंशत: 45 हजार रुपयांचे नुकसान झाले.कोणतीही जिवीत हानी नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*