जिल्ह्यात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी दि. 12 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 64.80 मिमी, दापोली 26.50 मिमी, खेड 45.10, गुहागर 47.30 मिमी, चिपळूण 59.20 मिमी, संगमेश्वर 42.00 मिमी, रत्नागिरी 55.20 मिमी, राजापूर 58.40 मिमी,लांजा 55.30 मिमी.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 12 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढील प्रमाणे आहे. रत्नागिरी तालुक्यात मौजे पानवल येथे स्वप्निल अनंत कांबळे त्यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून अंशतः नुकसान झाले आहे .कोणतीही जीवित हानी नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*