जिल्ह्यात सरासरी 15.69 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी दि. 21 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 15.69 मिमी तर एकूण 141.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 20.50 मिमी , दापोली 11.70 मिमी, खेड 25.00 मिमी, गुहागर 14.30 मिमी, चिपळूण 09.70 मिमी, संगमेश्वर 22.40 मिमी, रत्नागिरी 21.70 मिमी, राजापूर 07.30 मिमी,लांजा 08.60 मिमी.

नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 21 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड तालुक्यात मौजे पुरार-म्हाप्रळ-मंडणगड रस्त्यावर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाल्या आहेत. सदर सा.बां. विभागाकडून झाडे हटविण्याचे काम चालू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*