जिल्ह्यात सरासरी 01.43 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी – जिल्ह्यात 24 तासात सरासरी 01.43 मिमी तर एकूण 12.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
मंडणगड 00.00 मिमी
दापोली 00.00 मिमी
खेड 00.00 मिमी
गुहागर 00.00 मिमी
चिपळूण 05.90 मिमी
संगमेश्वर 03.10 मिमी
रत्नागिरी 01.80 मिमी
राजापूर 01.20 मिमी
लांजा 0.90 मिमी.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 04 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

दापोली तालुक्यात मौजे दाभोळे येथे सिता यशवंत पालशेतकर यांच्या घराशेजारी अचानक दरड कोसळल्याने ज्योती जितेंद्र पालशेतकर, वय वर्षे 41 ह्या किरकोळ जखमी झाल्या.

गुहागर तालुक्यात मौजे बंदरवाडी येथे सुमती नारायण पावळे यांच्या घराच्या समोरील ग्रा.पं. कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळल्याने सुमती नारायण पावळे, वय वर्षे 70, सायली पालशेतकर वय वर्षे 24, आदिती पालशेतकर वय वर्षे 45 ह्या किरकोळ जखमी झाल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*