मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू, व्याघ्र प्रेमींमध्ये हळहळ

मध्ये प्रदेशातील सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सुप्रसिद्ध कॉलरवाणी वाघिणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्युमुळे व्याघ्र प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. रय्यकसा कॅम्पअंतर्गत कुंभादेव कक्ष परिसरात वृद्धापकाळाने तिचा सायंकाळी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून टी-१५ वाघिणीवर देखरेख ठेवणे सुरू होते. मात्र, शनिवारच्या दरम्यान वाघिणीची हालचाल दिसून न आल्यामुळे वनविभागाच्या पथकाने शोध सुरू केला. शोधकार्यात ती घटनास्थळी मृतावस्थेत आढळली.

पेंच व्याघ्र प्रकल्पाशी शान अललेली टी-१५ कॉलरवाली नावाने प्रसिद्ध होती. २९ शावकांना जन्म देणारी सुपरमॉम या नावाने तिची वेगळी ओळख होती. तिला आणि तिच्या शवकांना पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असायची. परंतु शनिवारी सायंकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. पेंचच्या सिवनी क्षेत्रामध्ये कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म २००५ मध्ये झाला होता. त्यानंतर तिच्या आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला.

तिला कॉलरवाली वाघीण का म्हणायचे?

राजस्थानच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील लोकप्रिय मछली वाघिणीच्या नावावर २३ शावकांना जन्म देण्याचा विक्रम होता. २००८ साली तिची देखरेख करण्यासाठी वाईल्ड लाईफ तज्ज्ञांनी तिला रेडिओ कॉलर लावला होता. त्यामुळे तिला कॉलरवाणी वाघीण म्हणून ओळखलं जात होतं. याच वनक्षेत्रात कॉलरवाणी वाघिणीची मुलगी पाटदेवची टी-२ वाघीण आहे.

२९ शावकांना दिला जन्म

२००८ मध्ये तिने तीन शावकांना पहिल्यांदा जन्म दिला. परंतु या शावकांचा अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत मृत्यू झाला होता. त्यानंतर तिने सात वेळा शावकांना जन्म दिला. २०१० मध्ये पाच शावक, २०१२ साली तीन शावक त्यानंतर २०१५ मध्ये चार शावक अशा एकूण २०१८ या वर्षापर्यंत तिने २९ शावकांना जन्म दिला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*