आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यासंदर्भात भाष्य करता कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्याने त्याचा परिणाम देशातील इंधनदरांवरही होणार आहे. मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू नये म्हणून सरकार वेगवेगळे पर्याय पडताळून पाहत असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले