दापोली कृषी महाविद्यालयातील दहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह !

 दापोली :-  दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील सिंधुदुर्ग वसतिगृहात राहणाऱ्या एकूण १२०  विद्यार्थ्यांची अँटीजेन टेस्ट काल व आज अशी दोन दिवस करण्यात आली आहे. त्यापैकी एकुण १०  विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती दापोली तालूका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. लागण झालेल्या १० विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सौम्य लक्षणे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

या विद्यार्थ्यांना सध्या विद्यापीठातील स्वतंत्र इमारतीमध्ये विलगीकर कक्षात ठेवण्यात आले आहे.या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून संबंधित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.पुढील तीन दिवस ऑनलाईन क्लासेस सुरू रहाणार आहेत तशा सूचना सहयोगी अधिष्ठाता डाॅ.उत्तम महाडकर  यांनी केल्या आहेत. आणि दहा जानेवारी नंतर या चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने योग्य तो निर्णय दिला जाईल अशी माहिती विद्यापीठाचे  डाॅ.प्रमोद सावंत प्रमुख  विस्तार शिक्षण यांनी दिली आहे.
    

काेराेनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय आज होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार  परिषदेत मंगळवारी दिली हाेती.कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कराेनाचा संसर्ग होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.     

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*