रत्नागिरीत शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी : गेल्या ६८ वर्षांपासून रत्नागिरीमध्ये कार्यरत असलेल्या रोटरी क्लब रत्नागिरीने यंदाचा टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड सोहळा हॉटेल विवेक येथे आयोजित केला. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७०चे प्रांतपाल लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. रत्नागिरीतील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी येथे गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेले केतन चौधरी यांना शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणातील योगदानाबद्दल टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. प्रांतपाल लेनी डिकोस्टा यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

व्यासपीठावर रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सचिव विरकर, वरिष्ठ रोटरीयन दिलीप भाटकर आणि धरमसी चौहान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कळंबटे आणि वेदा मुकादम यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*