दापोली (प्रतिनिधी) :
ही आवडते मज मनापासूनी शाळा,
लाविते लळा ही जसा माऊली बाळा.
विद्यार्थी असो वा शिक्षक त्यांना शाळेचा लळा कधी कमी होत नाही. त्यातही मिशन आपुलकीने शाळेबद्दल आपुलकी वाढते, असे वाकवली नं.२ शाळेच्या मुख्याध्यापिका सायली संजय मेहता यांनी शुक्रवारी माधुरी मेनकार यांचे ऋणनिर्देशीत करताना सांगितले.
जि. प. रत्नागिरीचे मुख्यकार्यकारी किर्तिकिरण पुजार यांनी शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी मिशन आपुलकी सुरू केलं.
या मिशन आपुलकी अंतर्गत, जि.प.शाळा वाकवली नं.२ या शाळेतील विद्यार्थ्यांना भाषण करताना सभाधिटपणा यावा याकरिता शिक्षिका माधुरी मेनकार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदर शाळेच्या मुख्याध्यापिका सायली संजय मेहता यांचेकडे डायससाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली.
त्यांच्या या निविन्यपूर्ण ऊपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांचेकडून कौतुक करणेत आले.
यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर जाधव, शिक्षिका दिपाली पालवे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
माधुरी मेनकार यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेमार्फत मेनकार यांना शुभेच्छा देत मेहता यांनी आभार व्यक्त केले.