दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळस विद्यालयाचा बारावी वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून तब्बल 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
आर्या शिंदे 72. 67 गुणांनी प्रथम, प्रतीक चोगले 71.33 गुणांनी द्वितीय, सेजल रसाळ 70.83 गुणांनी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
विद्यालयाने दहावी प्रमाणेच बारावी च्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा आलेख चढता ठेवल्या मुळे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, सदस्य विजय कुमार खोत, अशोक जाधव, टाळसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर लाले , वसंत शिंदे आदींनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत ,ओंकार जोशी ,अविनाश शिंत्रे, शारदा धनगुडे, स्वप्नील धुमाळ आदींनी विशेष प्रयत्न केले.