पुणे– शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित शिवभोजन केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

शासकीय विश्रामगह येथे श्री.भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षणबाबत पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळला तरी तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.