पोलीस स्टेशनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं गुन्हा नाही, वर्धा पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई : पोलीस स्‍टेशन ही जागा ‘गोपनीयतेच्‍या कायद्यांतर्गत’ (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेलं ठिकाण नाही, असं स्पष्ट करत पोलीस स्‍टेशनमध्ये व्‍हिडीओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठानं रद्द केला आहे. 2019 सालच्या वर्ध्यातील एका घटनेसंबंधी याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही भूमिका घेतली.