उच्च न्यायालयाचे आभासी कामकाजही तीन तासच; तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मुख्य खंडपीठाचे आभासी पद्धतीने चालवण्यात येणारे कामकाजही मंगळवारपासून २८ जानेवारीपर्यंत केवळ तीन तासच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
