पुढील आठवड्यात उच्च न्यायालयाचे कामकाज नाही

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून पुढील आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.