काहीही करून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करा!

राजधानी दिल्लीतील गंभीर स्वरूपाच्या करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि प्राणवायूची टंचाई जाणवत असलेल्या रुग्णालयांना काहीही करून तत्काळ प्राणवायूचा पुरवठा करावा, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिला.