एसटीच्या मासिक आणि त्रैमासिक पासला मुदतवाढ

टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पास साठी, मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना या मासिक/ त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे.