विविध शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

कोकणातील हापुस आंबा देशातील मोठ्या शहरांमध्ये शेतक-यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरु केले आहे.