दापोलीत डोळ्यांची साथ, उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल
दापोलीत डोळयांच्या साथीचा फैलाव कमालीचा वाढला आहे. मात्र दापोली उपजिल्हा रुग्णालयात गेले अनेक महिने डोळे तपासणी साठी कोणीही नेत्रतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांची ससेहोलपट होत आहे. रुग्ण तपासणीसाठी जर उप जिल्हा रुग्णालयात तज्ञ वैदयकिय अधिकारीच उपलब्ध नसतील तर मग उप जिल्हा रूग्णालय हवेच कशाला ते बंदच करून टाका म्हणजे किमान येथे येण्याचा आमचा हेलपाटा तरी वाचेल अशाप्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया येथे आलेल्या रूग्णांकडून उमटत आहेत.
