कोकण कृषी विद्यापीठ झाडांना देतंय जीवनदान

दापोली तालुक्यातील वेळवी येथे उन्मळून पडलेल्या नऊ आम्रवृक्षांना दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ संतोष वरवडेकर, समीर झगडे, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले, संतोष बुरटे आणि चंद्रकांत कांबळे यांनी प्रत्यारोपण करून जीवनदान दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील 89% भागात वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त इतर भागात वीज खंडित झालेल्या ४ लाख १४ हजार ६९४ पैकी ३ लाख ७० हजार ७१२ (८९.३९ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

वादळग्रस्तांना दापोली लायन्स क्लबतर्फे मदत

यावेळी पाडले गाव चे सरपंच सौ. अक्षता हुमणे, उपसरपंच धाडवे व सर्व सदस्य यांनी भंडारवाडा, कोंडवाडी, ब्राम्हणअळी, गुहागरकरआळी, सापटआळी यांच्या वतीने 200 पॅकेटचा स्वीकार केला.