कोकणनगर कोरोना बाधित क्षेत्र जाहीर

रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. असा प्रस्ताव तहसिलदार रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  त्या परिसरामधील भाग Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) जाहिर करणे आवश्यक आहे.