कोरोनात सत्कार समारंभ टाळा, लगेचच कामाला लागा; पंतप्रधान मोदींचा नव्या मंत्र्यांना संदेश

कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या. जनतेत जा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया वा एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा. मात्र घेतलेल्या निर्णयांची नीट माहिती द्या, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिला.