घर बांधणी, घर दुरुस्ती अधिसूचनेतून रत्नागिरीला वगळू नये: जिल्ह्यातील आमदारांची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील घर बांधणी, घर दुरुस्ती अधिसूचनेमधून वगळण्यात येऊ नये, या मागणीसाठी शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे आज गुरुवारी निवेदन सादर करण्यात आले.