पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी घेतला पावसाळी परिस्थिती व कोरोना चा आढावा

राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थिती बाबत माहिती घेतली.