No Image

फेडरल बँकेमार्फत लस साठवणुकीसाठीच्या रेफ्रिजरेटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत कोविड- १९ लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी १०० रेफ्रिजरेटरचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाले.