करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

करोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.