कोरोनाची कॉलर ट्यून होणार बंद
कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पर्याय
अवलंबले होते.मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, मात्र आता या कॉलर ट्यूनला अनेक लोक वैतागली आहेत. मात्र आता लवकरच या कॉलर ट्यूनपासून सुटका होऊ शकते. केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत.
