मंडणगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदी अँड. सोनल बेर्डे तर उप नगराध्यक्ष पदी वैभव कोकाटे यांची निवड

मंडणगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष पदाचे निवडीकरिता आज मंडणगड नगरपंचायत कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे व मुख्याधिकारी विनोद डवले व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम राबवण्यात आला.