भुमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा तोडला
दापोली शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या लगत असणाऱ्या भुमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा मार्च महिन्या पासून 16 हजार रु. विज बिल थकल्याने आज महावितरणने गुरुवारी सकाळीच खंडित केला. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून व खेडेगावातून आलेल्या नागरिकांची व ग्रामस्थांची नकाशे न उपलब्ध झाल्याने मोठी गैरसोय पाहायला मिळाली.
