गडकरीकडून महाराष्ट्राला रिटर्न गिफ्ट; सात हजारांचं इंजेक्शन १२०० रुपयांना मिळणार

महाराष्ट्राच्या वर्धा येथील जेनेटीक लाइफ सायन्स येथे एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शन तयार करण्यास सुरवात केली आहे. हे म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वापरले जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.