ताडील (दापोली) : ताडील स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आज, २८ जुलै २०२५ रोजी ताडील गावातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यामध्ये सायटेवाडी, ताडील उर्दू, ताडील बागवाडी आणि ताडील सुरेवाडी येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला ताडील गावचे सुपुत्र व पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार, ताडील गावचे सरपंच, ताडील स्पोर्ट्स क्लबचे सल्लागार राजू पवार, सदस्य सुधीर शिगवण, अमेय बेकर, अंकित पिचुर्ले, नरेंद्र बेकर, निखिल बेकर, सायटेवाडीचे ग्रामस्थ अनंत शिगवण, गणेश शिगवण, महादेव शिगवण, बागवाडीचे ग्रामस्थ मनोहर नागले, मंगल धाडवे, सुरेवाडीचे ग्रामस्थ गोविंद फोपळे, विलास बेकर, बाबू बेकर, सुरेवाडी शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीता बेकर तसेच सर्व शाळांमधील मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सायटेवाडी शाळेतून झाली, तर समारोप ताडील उर्दू शाळेत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू पवार यांनी केले.

शांताराम पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.
उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात असे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचे सुचवले.
ताडील स्पोर्ट्स क्लबने गेल्या दोन वर्षांपासून ताडील प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेतून मिळालेला नफा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्याचा निर्णय क्लबच्या सांताक्रुझ येथील बैठकीत घेण्यात आला.
त्यानुसार, गावातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (शालेय पिशव्या) देण्याचे ठरले.
हा क्लबचा पहिलाच प्रयत्न असून, यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी क्लबचे योगदान राहील.