रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयात स्वामी स्वरूपानंद यांची जयंती दिनांक ८/१/२०२४ सोमवार रोजी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंती निमित्त दिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे दिसून आले.
लेझीम, ढोल ताशाच्या गजरात स्वामींची पालखी काढण्यात आली. पालखी नाचवत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भजने गायली.
लेझीम, ढोल, टाळ यांच्या तालात स्वामींची पालखी प्रशालेच्या सभागृहात आणली. तेथे सामुहिक आरती घेण्यात आली.
स्वामींच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून मनोभावे पूजा करण्यात आली.
विद्यार्थ्याना या प्रसंगी स्वामींच्या जीवनावर माहिती सांगण्यात आली. आभार प्रदर्शन झाल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .