कादिवलीच्या तनिष चव्हाणचे सुयश

दापोली : दापोली तालुक्यातील जि.प.केंद्रशाळा कादिवलीच्या तनिष शिरीष चव्हाण याला नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे आयोजित पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सुयश लाभले असून ३००पैकी २२२ गुण मिळवत, आपली गुणवत्ता सिध्द केली.तसेच युवराज सावंत व सलोनी घडसे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.

कोरोना काळातील अडचणीच्या परिस्थितीतही मार्गदर्शक शिक्षक विनेश साळवी यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी आपले प्रयत्न कायम ठेऊन सराव आणि सातत्यामुळेच यश संपादन झाल्याचे विनेश साळवी यांनी सांगितले.शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजी गट शिक्षणअधिकारी संतोष भोसले,केंद्रप्रमुख शितल गिम्हवणेकर , मुख्या.सुरेश साबळे,सुरेश पाटील,अविनाश मोरे,अनिल नलावडे,विजय शिगवण,भालचंद्र एकल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामविस्तार अधिकारी वीरेश कदम तसेच भानघर शाळेचे शिक्षक मंगेश शेडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.शाळा व्यवस्थापन समिती कादिवालीचे अध्यक्ष शिरीष चव्हाण, मनीषा पवार ,अवंती घाग ,शांताराम लाड ,नीता कदम यांनी देखील विद्यार्थाचे अभिनंदन केले. शाळेच्या वतीने तनिष चा सत्कार आला.यावेळी मुख्या.सुरेश साबळे,पदवीधर शिक्षक विनैश साळवी,संजना भेकत,महेश धानकुटकर आदि.उपस्थित होते. त्याला विनेश साळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*