नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बहुतेक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी आता सुप्रीम कोर्टानं यात लक्ष घालून मोठी घोषणा केली आहे. देशातील ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सुप्रीम कोर्टनं टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्समध्ये १२ सदस्यांचा समावेश असणार आहे.