सौ. सुनीता बेलोसे यांची संस्थेच्या ‘जनसंपर्क अधिकारी’पदी निवड

दापोली : आर. व्हि. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोलीच्या ‘पीआरओ’पदी सौ. सुनीता दिलीप बेलोसे यांची निवड करण्यात आली आहे.

सुनीता बेलोसे यांनी यापूर्वी 25 वर्षे आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्य पाहिलं आहे. याच दरम्यान त्यांनी 15 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून उत्तम कर्तव्य बजावलं आहे.

बी.एस.सी., बीएड, डीएसएम असं त्यांचं शिक्षण झालं असून त्यांनी आयुर्वेदाचार्यामध्ये पदवीका देखील मिळवली आहे.

सौ. सुनीता बेलोसे यांना शुभेच्छा देताना भक्ती महाडिक आणि सौ. सुनीता गावकर

शिक्षिका म्हणून त्या मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत्या. विद्यार्थ्यांप्रति त्यांना प्रचंड ममत्व होतं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे त्या जातीनं लक्ष पुरवत असत.

आता त्यांच्याकडे संस्थेची मोठी जबाबदारी आली आहे. संस्थेचं नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीनं त्या कार्य पाहणार आहेत.

जनसंपर्क अधिकारी म्हणून पालकांशी, विद्यार्थांशी, मान्यवरांशी संवाद साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

शाळा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘माय कोकण’ जवळ बोलताना व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांचं हित सर्वात पुढे ठेऊन निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे. आमच्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण तर मिळत आहेच शिवाय क्रीडा आणि कला प्रकारामध्येही मुलं नाव लौकिक मिळवत आहे.

सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील याकडे माझं लक्ष राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

सौ. सुनीता बेलोसे यांनी यापूर्वीही संस्थेच्या प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांची ही नवी कारकीर्द सुद्धा तेवढीच किंबहुना अधिक दैदिप्यमान असेल यात शंका नाही. दापोली, मंडणगड आणि जिल्ह्यामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*