जालगाव येथे ज्येष्ठ नागरिकांची आत्महत्या

दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव विष्णू नगर येथे रहाणारे कृष्णचंद्र मुरलीधर काजळे वय ७० यानी आज सकाळी मंगलमूर्ती अपार्टमेंट लष्करवाडी येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित आपण आजाराला कंटाळून आत्महत्या करित आहोत असा मजकूर नोंदविला असल्याची माहिती पोलीसानी दिली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली जावई असा परिवार असून त्यांची जालगाव येथे रहाणारी मुलगीच त्यांचा सांभाळ करित होत असल्याची माहिती पोलीसानी दिली असून घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा ढेरे करित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*