सुधीर कालेकर यांची दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

दापोली – दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सुधीर कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुधीर कालेकर यांच्यावर संपूर्ण दापोलीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दापोली तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक 6 नोव्हेंबर रोजी पार पडली. ही निवडणूक सहकार पॅनलने सुधीर कालेकर यांच्या नेतृत्वाखाली 16 विरुद्ध 1 अशा फरकाने जिंकली.

आज पुन्हा एकदा दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी सुधीर कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी वसंत शिंदे यांची निवड करण्यात आली.

यावेळी दापोली सहाय्यक निबंधक तृप्ती उपाध्ये,
संचालक भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, राजेंद्र पेटकर, प्रीतम रुके, संजय महाडिक, सुनील पुळेकर, अनंत करबेले, वर्षा शिर्के, स्मिताली राजपुरे आदि उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*