देवरूखात गादी कारखान्याला भरदुपारी अचानक आग

रत्नागिरी:-देवरूखातील महाडीक स्टाँपनजीकच्या गादी कारखान्याला अचानक आग लागल्याने गोंधळ माजला. देवरूख शहरातील महाडीक स्टाँपनजीकच्या गादी कारखान्याला भर दुपारी अचानक आग लागली होती. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वीज सेवा खंडीत केल्याने आग विझविणेत अडचणींना सामोरे जावे लागले. देवरूख नगर पंचायती कडे अग्निशामक यंत्रणा नसलेने फार मोठी समस्या पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. मुबीन मालगुंडकर यांचेसह शेजारील लोकांकडून पाणी आणत ग्रामस्थांनी आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीते वृत्त कळताच नगर पंचायत व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*