सरस्वती विद्यामंदिर दापोली व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
उच्च प्राथमिक गटात प्रतिकृती (Model) स्पर्धेत अबुजर रियाज अहमद म्हैशाळे ,अब्दुल हादी हिम्मत टेटवलकर यांनी प्रथम तर माध्यमिक गटात प्रतिकृती (Model) स्पर्धेत आय्यान मुदस्सर मुरुडकर,अशहद अमजद सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यातील बहुतांश शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये माध्यमिक गटात आएशा असलम नदाफ ,तेहरीम हसरत सौतीरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रदर्शनाच्या बक्षीस समारंभात सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री. समीर गुजराथी, दापोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र सांगडे , उर्दूचे विस्तार अधिकारी नजीर वलेले , गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. सुनील कारखेले यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष नजीर पठाण, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटीचे चेअरमन जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे चेअरमन आरिफ मेमन, हमीद बांगी, नाझीम काझी, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक रिजवान मणियार, आफ्रीन दफेदार, मोहतसीम रखांगे यांचे अभिनंदन करत जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या.

