राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीला राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी करण्यात आली आहे.

लॉकडाऊन घोषित जिल्ह्यांची नावे

• बीड- 5 मे ते 12 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन
घोषित.

• अमरावती – संपूर्ण जिल्ह्यात 9 मे ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू

• सातारा 7 मे ते 13 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा

• सांगली जिल्ह्यात 5 मे ते 12 मे पर्यंत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार

सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 ते 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

• वाशिम जिल्ह्यात 9 मे पासून 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय प्रशासनाने घेतला

• यवतमाळ – 9 मे ते 15 मे पर्यंत कडक निर्बंध जाहीर

• अकोला जिल्ह्यात 9 मे ते 15 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन आहे.