पनवेल -दापोली एसटी बसवर झाली दगडफेक

दापोली :- दापोली तालुक्यातील महाळुंगे अंगणवाडी येथे एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालक नरेश पांडुरंग कांबळे (37, रा. दापोली) हे दापोलीतून पनवेलला बस घेऊन निघाले होते. त्यानंतर ते पनवेल वरून पुन्हा दापोलीकडे ५० प्रवासी घेऊन रवाना झाले. त्यातील काही प्रवासी आपापल्या स्टॉपवर उतरले. यानंतर ही बस महाळुंगे गवाणे येथे आले असता रस्त्याच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या हातातील दगड बसच्या दर्शनी काचेवर मारून काच फोडली. यात 10 हजार रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी नरेश कांबळे यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार भादवी कलम 427 नुसार सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*