नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणासोबत अर्थकारणावरही दिसू लागले आहेत. हे असेच चालू राहिले तरं याचा परिणाम साऱ्या जगाला भोगावा लागेल अशी परिस्थिती आहे आज सकाळीच रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजार कोसळला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1,600 अंकांनी घसरला. ही घसरण 2000 अंकांपर्यंत गेली होती. आज झालेल्या पडझडीत जवळपास 10 लाख कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

गुंतवणूकदारांना मोठा फटका
– काल बाजार बंद झाल्यानंतर BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 256 लाख कोटी इतके होते
– आज बाजार घसरल्यानंतर तो 246 कोटी रुपयांच्या खाली आला
– आज गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले
– मागील सात दिवसांत गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज

रशियन शेअर बाजारात सुनामी
रशियातील शेअर बाजारांची स्थितीही वाईट आहे. रशियन शेअर बाजार विक्रमी उच्चांकावरून 30 टक्क्यांनी घसरला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति डॉलर इतका झाला. मागील सात वर्षातील हा उच्चांकी दर आहे.