आजदेखील भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाल्याचं पाहायला मिळालं.

रशिया आणि युक्रेनचे युद्ध आणि अमेरिकन शेअर बाजारामध्ये सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

बीएसई निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४२२ अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीमध्ये ११४ अंकांची घसरण झाली.

आज शेअर बाजार सुरू झाला, सध्या स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील स्टॉकच्या शेअर्समध्ये वाढ होत आहे.

आयटी, फार्मा, ऊर्जा, रिअल इस्टेट, ऑईल आणि गॅस सेक्टरमधील शेअर्सही वधारताना दिसत आहेत.

बँकिंग, ऑटो आणि मेटल सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. आज सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांपैकी १५ शेअर्स वधारले आहेत.

निफ्टीमधील ५० कंपन्यांपैकी २१ शेअर्सची घसरण झाली. पॉवर ग्रिडच्या शेअरमध्ये वाढ होत आहे. सर्वात मोठी घसरण हिंदाल्कोच्या शेअरमध्ये दिसत आहे.

सकाळी १० वाजून १५ मिनिटाच्या सुमारास सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी २४ अंकांनी वधारला. शेअर बाजार आजही अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.