चिपळूण:- चिपळूण बार कौन्सिलचे अध्यक्ष नितीन सावंत यांना चिपळूण शहरातील विविध महिला संस्थांमार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात अत्याचारीत परिचारिकेच्या आरोपीचे वकीलपत्र कोणी घेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे निवेदन देताना महिला मंडळ वडनाका, चिपळूणच्या अध्यक्षा आदिती देशपांडे, हेल्प फाऊंडेशन चिपळूणच्या उपाध्यक्षा अंजली कदम, लायन्स क्लब गॅलक्सीच्या प्र्रांजल गुंजोटे व अध्यक्ष रूमा देवळेकर, संरक्षण अधिकारी माधवी जाधव, चिपळूण तालुका मुस्लिम महिला मंडळाच्या अध्यक्षा रिहाना बिजले, नगरसेविका रसिका देवळेकर, चिपळूण मुस्लिम वुमन्स ऍण्ड चाईल्ड वेल्फेअर संघटनेच्या अध्यक्षा नसरीन खडसे तसेच भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रतिज्ञा कांबळी उपस्थित होत्या.