रत्नागिरी – राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा रत्नागिरी मध्ये पहायला मिळणार आहे. कुस्ती स्पर्धा २० आणि २१ जानेवारी दरम्यान शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून ४४ व्या कुमार राज्यस्तरीय स्पर्धेचे दिनांक २० आणि २१ जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे.

उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे.

राज्यातील आघाडीचे कुमार मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सलग दोन दिवस कुस्तीचा थरार रत्नागिरीकरांना पहायला मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर व कार्यवाह सदानंद जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून करण्यात आले आहे.