राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार : अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणासाठी बुधवारी कोल्हापुरात पहिलं मूक आंदोलन झाल्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. यावेळी बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आम्ही या मागणीसाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात आम्ही जाणार आहोत. रिव्ह्यू पीटीशन नुसतं फाईल करून अर्थ नाही. 50% मर्यादा घालण्यात आली आहे. या बाबी पाहाव्या लागतील. आठवडाभराच्या आत पिटीशन दाखल झाली पाहिजे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, असं चव्हाण यांनी सांगतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*